मका, दूध उत्पादकांना मुरघास ठरतोय वरदान

वाडा- खेड तालुक्‍यातील कडूस या गावी एका शिक्षकाने मुरघास उद्योग सुरू केला आहे. हा खेड तालुक्‍यातील एकमेव मुरघास उद्योग असून मका आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा उद्योग वरदान ठरत आहे.
पशुधन व्यवस्थापनात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पशुचारा आणि पशुखाद्य. याच बाबीचा विचार करून अभिजित शेंडे या शिक्षकाने 1 एकर क्षेत्रात मुरघसचा प्रकल्प टाकला आहे. एकदम निघणार ओला चार कुट्टी करून हवाबंद केला जातो आणि 45 ते 60 दिवसाच्या कालावधीत तो जनावरांना दिला जातो, यामुळे जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढते, जनावरांचे आरोग्य चांगले राहते. परदेशामध्ये मुरघास ही पशुसंवर्धनासाठी अत्यावश्‍यक बाब मानली जाते. त्याच धर्तीवर आपल्या देशात पंचायत समिती पशुसंवर्धन विभागातून मुरघास प्रकल्पासाठी अनुदानही मोठ्या प्रमाणात दिले जाते. या अत्यावश्‍यक बाबीचा विचार करून शेंडे यांनी मुरघास प्रकल्प सुरू केला. या मुरघासचा वापर सध्या त्याच्याच गोठ्यास चांगला होत आहे.याशिवाय या प्रकल्पातून विदेशी बाजारपेठ मिळवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. मुरघास प्रकल्पात स्थानिक शेतकऱ्यांच्या मका पिकाला चांगली किंमत मिळते, शिवाय एकाच दिवसात पूर्ण शेत मोकळे होते. त्याचा उपयोग शेतकऱ्यालाया दुसरे पीक घेण्यासाठी शेतजमीन लगेचच मोकळी होते, तसेच रोख स्वरूपात रक्कम एकाच वेळी हातात येते. मूरघास प्रकल्पपूर्वी थोडी थोडी मका न्यावी लागत होती त्यामुळे शेतकऱ्याचे चारा व्यवस्थापन चुकत होते. कधी मोठ्या प्रमाणात चाराजकीय उपलब्ध असे तर कधी तो कमी पडे मात्र, या प्रकल्पामुळे शेजारच्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी स्वादिष्ट चारा मिळेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)