मंदिर दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

पिंपरी – पिंपळे गुरव येथील पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार सुरु असतांना दग़डी सभामंडप कोसळून 3 मजूराच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या महापालिकेच्या अभियंत्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रफिकभाई कुरेशी यांनी पोलीस आयुक्‍त आर. के पद्मनाभन यांच्याकडे केली आहे.

पिंपळे गुरव येथील महादेवाच्या पुरातन मंदिराचा जोर्णोद्धार करत असतांना दगडी सभामंडप कोसळून 3 मजूरांचा मृत्यू व काही मजूर गंभीर झाले आहेत. याबाबत महापालिकेच्या संबधित अधियंत्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुढे निवेदनात म्हटले आहे. की, महापालिकेकडून गतवर्षी 16 नोव्हेंबर रोजी अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. मात्र, याकडे शहर अभियंता राजन पाटील व अंबादास चव्हाण यांनी दुर्लक्ष करुन कारवाईस टाळाटाळ केली यामुळेच हा अपघात झाला आहे. यामुळे, यांच्यावर हा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर सालारभाई शेख, रवी यादव, मुक्तार पठाण, वाहिदा शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.