मंत्रालयाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई – सावकारी जाचाला कंटाळून धाराशीवमधील एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या महिलेला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. अलका कारंडे असे या महिलेचे नाव आहे.

अवैध सावकारीला कंटाळून सहकुटुंब मंत्रालयात आत्मदन करणार असल्याचे पत्र 2 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. आबासाहेब कारंडे यांच्या नावाने हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. या पत्रानंतर पोलहस सावध झाले होते. पण सकाळी साडे अकराच्या सुमारास कारंडे कुटुंबातील ही महिला मंत्रालयाच्या गार्डन गेटजवळ आली आणि अंगावर रॉंकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण या गेटवर सुरक्षा व्यवस्थेवर तैनात असलेल्या पोलिसांनी हा प्रकार बघितला आणि त्वरीत या महिलेला ताब्यात घेतले. या महिलेला मरीन ड्राईव्ह पोलहस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अवैध सावकारीची होणार चौकशी
प्रधान सचिव रजनीश शेठ यांनी या महिलेची चौकशी केली तेव्हा कर्जवसुलीसाठी कसा त्रास दिला जातो याची माहिती दिली. कर्जवसुलीसाठी ट्रॅंक्‍टर ओढून नेला होता. अवैध सावकारी सुरु असल्याची तक्रार या महिलेने केली. त्यानंतर शेठ यांनी स्थानिक पोलिसांना तातडीने पत्र पाठवून अवैध सावकारीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)