मंत्रालयाच्या धर्तीवर पालिकेत सुरक्षा जाळी

पिंपरी – मुंबई मंत्रालयातील मजल्यांवरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे मंत्रालयात सुरक्षा जाळी बसविण्यात आली होती. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात देखील पहिल्या मजल्यावर सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. महापौर नितीन काळजे यांच्या मागणीनंतर ही जाळी बसविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात धर्मा पाटील यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयासमोरुन खाली उडी मारत आत्महत्या केली. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यानंतर याच घटनांची पुनरावृत्ती झाल्याने, मंत्रालयात सुरक्षा जाळी बसविण्यात निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरक्षा जाळी बसविण्याची चर्चा सुरू झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर नितीन काळजे यांनी 16 एप्रिल 2018 रोजी महापालिका आयुक्तांशी पत्र व्यवहार करत, मुख्यालयात सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने याची तीन महिन्यांनंतर दखल घेत, मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर सुरक्षा जाळी बसविली आहे.

महापालिका मुख्यालयात एकून चार मजले असून, सर्व विभागांचे प्रमुख याच ठिकाणी बसतात. मात्र, अद्यापही मुख्यालयात कोणीही उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ही सुरक्षा जाळी लावण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)