मंचर येथे राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव

मंचर-खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. 1 ते दि. 8 मे दरम्यान मंचर येथे रोज सायंकाळी 7 ते 9 वाजता महाराष्ट्रातील कीर्तनकार महाराजांचा भव्य कीर्तन महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे, अशी माहिती निमंत्रक सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.
मंचर येथे कीर्तन महोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील बाणखेले, ग्रामपंचायत सदस्य अरूण बाणखेले, स्वप्नील बेंडे पाटील, रंगनाथ थोरात, युवासेनेचे कल्पेश बाणखेले यांच्यासह कीर्तन आयोजन समितीचे सदस्य आणि विविध मान्यवर उपस्थित होते. मंगळवारी हभप ऍड. धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे लांडेवाडी, बुधवारी हभप बालकीर्तनकार अविनाश महाराज वाघ धुळे, गुरुवारी हभप संजय महाराज पाचपौर विदर्भरत्न, रामायानाचार्य शुक्रवारी हभप समाधान महाराज भोजेकर, शनिवारी हभप विनोद्मुती बाबासाहेब महाराज इंगळे बीड, रविवारी हभप ऍड. जयवंत महाराज बोधले पंढरपूर, सोमवारी देहु येथील गाथा मंदिर अध्यक्ष हभप पांडुरंग महाराज घुले, मंगळवारी हभप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूर यांचे सकाळी 9 ते 11 काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर “आई माझी मायेचा सागर’ कविता निर्माते हभप पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे गायन आणि काल्याच्या दिवशी खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्‍यातील भागवत धर्माची पताका अहोरात्र खांद्यावर घेऊन समाजप्रबोधन करणाऱ्या 1001 वारकरी संप्रदाय कीर्तनकार महाराजांचा पोशाख व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर काल्याच्या महाप्रसादचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या भव्य कीर्तन महोत्सव सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कीर्तन महोत्सव नियोजन समिती, शिवसेना-युवासेना, महिला आघाडी आंबेगाव तालुका, लोकमान्य प्रतिष्ठानने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)