मंचर येथे कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये दोनशे मल्लांचा सहभाग

मंचर- येथे कुलदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त कुस्त्यांचा भव्य आखाडा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये दोनशे मल्लांनी सहभाग घेतला होता.आखाड्यात महिलांच्या कुस्त्याही पार पडल्या. 100 रुपयांपासून 11 हजार रुपये रकमेच्या कुस्त्या यावेळी लावण्यात आल्या. याचे उद्‌घाटन सतीश बेंडे, अजित काटे, सिताराम लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. मागील पाच वर्षांपासून दहा वर्षांखालील मुलांना कुस्ती खेळल्यानंतर रेवड्यांचे वाटप करण्यात येते. कार्यक्रमात यात्रा कमिटीच्या वतीने मंचरचे पैलवान गुलाबभाई यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यात्रा कमिटीचे अध्यक्ष दत्ता थोरात, सुनील बाणखेले, वसंत बाणखेले, युवराज बाणखेले, गोकुळ बाणखेले, कैलास गांजाळे, प्रवीण मोरडे, जे. के. थोरात, राजा थोरात, अरुण गांजाळे, संतोष माशेरे, गोटू शेटे, जगदीश घिसे, गणेश महाराज भोर आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.