मंचर बसस्थानकात एसटी थांबविल्याने प्रवाशांची गैरसोय

मंचर- खेड-चाकण येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारल्यामुळे पुणे-नाशिक रस्त्यावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मंचर येथून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बस मंचर बसस्थानकात थांबविण्यात आल्यामुळे प्रवाशांची सोमवारी (दि.30) गैरसोय झाली.
चाकण येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केल्याने मंचर येथुन पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बस मंचर बसस्थानकात उभ्या केल्या. नाशिक, नारायणगांव, श्रीक्षेत्र भीमाशंकर येथून पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसेस चाकण येथील आंदोलनामुळे थांबवण्यात आल्या. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत एसटी बस मंचर बसस्थानकात थांबवण्यात आल्या. काही एसटीचबसच्या फेऱ्या रद्द झाल्याने अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. चाकण येथे एसटी बस पाठवून तेथील आंदोलनामुळे नुकसान होऊन नये, म्हणून एसटी महामंडळाने खबरदारी घेऊन मंचर बसस्थानकात काही एसटी बस थांबविण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रक एम.एस.सय्यद यांनी दिली. सुमारे 40 ते 50 एसटी बसेस मंचर बसस्थानकात थांबल्या होत्या. चाकण येथील परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर काही एसटी बस पुण्याकडे पाठविल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
राजगुरूनगर, चाकण, भोसरी, नाशिक फाटा, पुणे, तळेगाव दाभाडे, लोणावळा, चाकण, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मंचर बसस्थानकात चाकण येथील आंदोलनाची तीव्रता कमी केव्हा होईल. आम्ही घरी किंवा आमच्या कामासाठी केव्हा जाऊन याची वाट पाहत होते. सायंकाळी काही एसटी बसेस तसेच खासगी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असताना आणि रस्त्यातील खड्ड्यामुळे वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)