मंगळावर द्रवरुप पाण्याचे पहिले तळे आढळले

तांबा, (अमेरिका) – मंगळावर पहिल्यांदाच भूमिगत पाण्याचे तळे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तेथे अधिक पाणी आणि जीवसृष्टी असल्याची शक्‍यता अधिकच वाढली आहे. इटलीच्या अंतराळ संशोधकांनी अमेरितील विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये याबाबतचा दावा केला आहे.

मंगळावरील “मार्टियन आईस’च्या खाली हे 20 किलोमीटर रुंदीचे तळे असल्याचा दावा या शोधनिबंधामध्ये करण्यात आला आहे. मंगळावर द्रवरुप पाण्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. पूर्वी मंगळावर तात्पुरत्या पाण्याचे ओघळ असल्याचे आढळले होते. मात्र जीवनासाठी उपयुक्‍त अशा पाण्याचा साठा आढळला नव्हता, असे ऑस्ट्रेलियातील स्विन्बर्न विद्यापिठाचे सहयोगी प्राध्यापक ऍलान डफी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळ ग्रह सध्या थंड, ओसाड आणि कोरडा आहे. मात्र तेथे उष्णता आणि ओलावाही असतो. तेथे किमान 3.6 अब्ज वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर द्रवरुप पाणी होते. सध्याच्या काळातल्या पाण्याच्या खुणा शोधण्यास शास्त्रज्ञ विशेष उत्सुक आहेत. कारण या खुणा मिळाल्यासच मंगळावर कधीकाळी जीवसृष्टी अस्तित्वात होती का, या प्रश्‍नाचे उत्तर मिळू शकणार आहे. पाण्याचे स्रोत सापडल्यास भविष्यात मंगळावर मानवाला जिवंत राहता येण्याजोगी स्थितीची शक्‍यताही तपासता येणार आहे.

सापडलेल्या तळ्यातील पाणी पिण्यायोग्य नसेल. हे पाणी बर्फाच्या थराच्या 1.5 किलोमीटर खाली आहे. या विपरीत हवामानामध्ये सूक्ष्मजीवसृष्टीही राहू शकेल की नाही, हा एक स्वतंत्र वादाचा मुद्दा आहे. हे तळे थंड आणि त्यात मंगळावरील खनिजांचे विघटन न होणारे घटक मिसळले आहेत, त्यामुळे त्याला खूप खारटपणा आहे. तेथील तापमान गोठणबिंदूच्या खाली आहे. मात्र पाण्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम असल्याने ते द्रवरुप राहू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)