मंगळवार पासून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

कोल्हापूर – अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवार 5 जून पासून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या सोहळ्यात तीन लाखांवर भाविक सहभागी होणार असून त्यांच्यासाठी अन्नछत्रासह विविध सुविधा उपलब्ध केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, समितीचे मार्गदर्शक, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल. सहा जूनला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा होईल.

पाच आणि सहा जूनला सोहळा होणार असला तरी एक जूनपासूनच शिवभक्तांच्या तुकड्या रायगडावर दाखल होणार आहेत. पाच जूनला सकाळी स्वच्छता मोहिम होईल. दुपारपासून मोफत अन्नछत्राला प्रारंभ होईल. दुपारी साडेतीनला खासदार संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे चित्त दरवाजा येथे स्वागत होईल आणि त्यानंतर त्यांच्यासह शिवभक्त पायी गड चालण्यास प्रारंभ करतील. साडेचारला एकवीस गावातील सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गडपूजन होईल. सहा वाजता गडावर उत्खननात सापडलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. साडेसहाला मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके तर त्यानंतर शाहिरी कार्यक्रमाला प्रारंभ होईल. रात्री आठ वाजता खासदार संभाजीराजे छत्रपती शिवभक्तींशी थेट संवाद साधतील. त्यानंतर गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, किर्तन, “ही रात्र शाहिरांची’ हा कार्यक्रम होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहा जूनला सकाळी सहा वाजता नगारखाना येथे ध्वजपूजन होईल. त्यानंतर शाहिरी कार्यख्रम होईल. साडेनऊला राजसदरेवर शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन होईल. दहा वाजता खासदार संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरेवर आगमन व त्यानंतर राज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ होईल. मुख्य सोहळ्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांचे मार्गदर्शन होवून त्यांच्या उपस्थितीत पोलखी सोहळा होईल. दुपारी बारा वाजता सोहळ्याची सांगता होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)