मंगळवारपासून पुणे ते हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे

पुणे- मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असल्याने रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे ते हजरत निजामुद्दीन दरम्यान एक विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवार (दि.29) पासून ही रेल्वे सुटणार असून त्याचे आरक्षण रविवारपासून (दि.27) सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

नव्याने सुरू होणारी ही विशेष रेल्वे असून यासाठी विशेष शुल्क आकारण्यात येणार आहे. 02099 सुपरफास्ट विशेष रेल्वे मंगळवारी (दि.29) मध्यरात्री 12 वाजून 25 मिनिटांनी पुणे स्टेशनवरून सुटून हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 2 वाजता पोहोचणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या सुपरफास्ट गाडीला चिंचवड, लोणावळा, पनवेल, वसई रोड, सूरत, वडोदरा, गोध्रा, रत्लाम, कोटा, मथुरा आदी ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गाडीमध्ये जास्त प्रवाशांना प्रवास करता यावा यासाठी एक वातानुकूलित 2 टियर, एक वातानुकूलित 3 टियर, 9 शयनयान कोच, 2 सेकंड क्‍लास व 7 जनरल सेकंड क्‍लास कोच या गाडीला जोडण्यात येणार आहेत. हजरत निजामुद्दीन या विशेष रेल्वेने प्रवास करू इच्छिणारे प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत साईटवर जाऊन ऑनलाईन बुकींग करू शकतात. त्याचप्रमाणे पुणे स्टेशनवरील आरक्षण केंद्रावरदेखील तिकीट काढू शकतात. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)