भ्रष्टाचार निवारण समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी कल्पना भेगडे

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना केशव भेगडे यांची जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड झाली.

भेगडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डी. व्ही. गवई यांनी दिले. त्यांच्या निवडीबद्दल मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. सत्कारप्रसंगी भेगडे म्हणाल्या, समाजातील महिलांचे संघटन मजबूत करून शासकीय कामातील दप्तर दिरंगाई रोखण्यासाठी पुढाकार घेऊ व अन्यायग्रस्त महिलांच्या प्रश्‍नांना वाचा फोडू.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)