भोसे येथील शेतकर्‍याचे विषप्राशन

हरित लवादाने अटक वॉरंट बजावल्यानंतर होता तणावाखाली : गावात संतापाची लाट

पाचगणी, दि. 28 (प्रतिनिधी) – राष्ट्रीय हरित लवादाने महाबळेश्वर तालुक्‍यातील भूमिपुत्रांना अटक वॉरंट बजावून लक्ष्य केल्याच्या भूमिकेला कंटाळून भोसे (ता.महाबळेश्वर) येथील शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने आता माथेरानपाठोपाठ महाबळेश्वरलासुद्धा लक्ष केंद्रित केले असून राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली येथील फरीदाबाद न्यायालयाने पहिल्या टप्प्यात महाबळेश्वर तालुक्‍यातील खाजगी मालकीच्या वनसदृश्‍य मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेल्या 33 मिळकतधारकांना अटक वॉरंट बजावले आहे. या मिळकतधारकांना 30 जुलै रोजी दिल्ली येथे कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावल्याने स्थानिक भूमीपुत्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, अटक वॉरंटमुळे भोसे येथील केशव धोंडिबा गोळे व त्यांचा मुलगा गणेश हे तणावाखाली होते.
या तणावामुळे गणेश गोळे यांनी विषारी किटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने त्यांना वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गणेश गोळे यांनी आई-वडिलांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, वनविभाग आणि एन्व्हायरमेन्ट ग्रुप हे धनिकांना सोडून सर्वसामान्य स्थानिक मालकी हक्काच्या जमीनमालकाना नोटिसा बजावून आर्थिक अडचणीत टाकत आहे. आमच्या जमिनीत आम्ही घर बांधले हा गुन्हा आहे का? आम्हा गोरगरिबांना दिल्ली वारी परवडणारी नसून आमच्या आयुष्यात काहीही गुन्हा नसताना अटक वॉरंट काढून जीवाशी खेळ सुरू आहे. माणसे न्याय हक्कासाठी जीव देताहेत, त्याच पद्धतीने जीवनयात्रा संपवत आहे, असे चिठ्ठीत नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)