भोसरी रुग्णालयात लवकरच ओपीडी सुरु करणार

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरीत उभारलेल्या 100 खाटांचे रुग्णालयात लवकरच बाह्यरुग्ण विभाग सुरु केला जाणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी मंगळवारी(दि.26) पत्रकरा परिषदेत दिली. आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान या रुग्णालयात सध्यातरी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यावर हर्डीकर यांनी सहमती दर्शविली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालकेच्या वतीने भोसरीत 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र, वैद्यकीय विभागाकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे वायसीएममध्ये पुरविल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधांवर कमालीचा ताण येत आहे. त्यामुळे या रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी दरवर्षी 21 कोटी खर्च होणार आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळात हे रुग्णालय चालविण्यापेक्षा ते खासगी संस्थेला चालवायला देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आल आहे.

या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक विकास डोळस व काही अन्य नगरसेवकांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. या प्रस्तावाची अंमलबजावणी होईपर्यंत महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने याठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याविषयी चर्चा करण्यात आली. वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर याठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरु करणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.