भोसरीला मंगळवारी विस्कळीत पाणी

पिंपरी – गवळीमाथा येथील पंपींग पॅनल खराब झाल्यामुळे भोसरी, चिखली परिसराला मंगळवारी (दि. 24) विस्कळीत स्वरुपाचा पाणी पुरवठा होणार आहे.

महापालिकेचे गवळी माथा येथील पंपींग विद्युत पॅनल खराब झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी या पंपींगवर अवलंबून असणारा चक्रपाणी वसाहत, धावडे वस्ती, लांडगेनगर, सेक्‍टर क्रमांक 1, गुरुविहार, लांडगेवस्ती, सद्‌गुरुनगर, चऱ्होली, मोशी, बोऱ्हाडेवाडी, भगतवस्ती, गुळवेवस्ती, सेक्‍टर क्रमांक 4 व 6, जय गणेश साम्राज्य आदी भागाला मंगळवारी विस्कळीत पाणी पुरवठा होईल.

तसेच बुधवारी (दि. 25) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी आवश्‍यक पाण्याचा साठा करावा, तसेच पाण्याची काटकसर करुन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)