भोसरीत 125 कामगारांची आरोग्य तपासणी

निगडी – जागतिक हृदयदिनानिमित्त भोसरी येथील डायनोमर्क कंट्रोल्स्‌ कंपनीतील 125 कामगारांची ई. सी. जी., रक्तातील साखरेचे प्रमाण, हाडांची ठिसूळता, डोळे तपासणी धनुर्वात लसीकरण अशा अनेक विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी मोफत औषध वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्‌घाटन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र प्रमुख व डायनोमर्क कंट्रोलसचे मनुष्यबळ विकास प्रमुख सूर्यकांत मुळे व अशोक लेलॅंड लि. चे विभाग प्रमुख वरदराज व महेंद्रम यांच्या हस्ते दिपप्रजवलन करून करण्यात आले. यावेळी कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक प्रदीप बोरसे, सुरेश पवार, गुणवंत कामगार पुरस्कार विजेते आण्णा जोगदंड, प्रिया देशमुख, अक्षरा राऊत, विभाग प्रमुख हेमंत नेमाडे, मोहन कृष्णन, पंडीत वनस्कर आदी उपस्थित होते. यावेळी सहदेव गोळे जनसंपर्क अधिकारी यांनी कॅन्सर होउ नये म्हणून व झाल्यानंतर घ्यावयाची काळजी या विषयी कामगारांना मार्गदर्शन केले. लोकमान्य रुग्णालयाचे डॉ. शरद धावडे शरद, डॉ आयशा मोमीन, डॉ सत्यवान गडदे, राजू वाईकर यांनी सहकार्य केले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)