पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे पहिल्या फेरीपासून आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. ते 40 हजार मतांनी आघाडीवर आहे.
भोसरी मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्यात लढत आहे. त्यांच्यासह 12 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. या मतदार संघात 58.65 टक्के मतदान झाले आहे. एकूण 2 लाख 58 हजार 719 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
याठिकाणी 20 टेबलांवर मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीच्या 21 फेर्या होणार असून पहिल्या फेरीपासूनच लांडगेंची आघाडी घेतली असून त्यांच्या मतांच्या जवळपास पोहचताना लांडे यांची दमछाक होत असल्याचे पहायला मिळत आहे. लांडगे यांनी तब्बल 40 हजार मतांची आघाडी घेतली आहे.