भोसरीतील जनजीवन सुरळीत

मराठा आरक्षण आंदोलन : स्थानिक नागरिकांना दिलासा

पिंपरी – सोमवारी लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्‍वभूमीवर आज भोसरी आणि पिंपरीत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे सामान्यांचे जनजीवन सुरळीत सुरू झाले असून, परिस्थिती पूर्ववत झाल्याचे चित्र दिसून आले. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने चाकण, खेड आणि भोसरीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे सामान्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शहरात नेहमीच गजबजलेले ठिकाण असलेले नाशिक फाटा आणि भोसरी भागातील व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे सामान्यांना आणि व्यवसायिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांचे स्टॉल, हातगाड्या, हॉटेल आणि खासगी वाहनांच्या फेऱ्या बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला होता. तसेच चाकण आणि राजगुरूनगरकडे जाणाऱ्या बस बंद असल्याने प्रवाशांना माघारी परतावे लागले. मात्र, आज ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त दिसून आल्याने परिस्थिती निवळल्याचे चित्र दिसून आले. नाशिक फाट्यावरून नाशिकला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. परंतु, पेटलेल्या वातावरणामुळे कोणतीही बस तिकडे जायला तयार नसल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. बऱ्याच प्रमाणात संध्याकाळ्च्या वेळी नागरिक नाशिक फाट्यावरून माघारी फिरतानाचे दिसून आले. तोच प्रकार भोसरीतही दिसून आला होता. परंतु, रात्री परिस्थिती निवळल्यावर वाहतूक सुरू झाल्यावर अडकलेल्यांना उशिरा घरी जायला मिळाले.

चाकरमान्यांची कोंडी
तसेच पुणे-पिंपरीतून चाकण, राजगुरूनगर आणि नारायणगावपर्यंत कामावर येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने आंदोलनामुळे चाकरमान्यांची अडवणूक झाली होती. परिस्थिती निवळेपर्यंत त्यांना ही कुठलेच वाहन न मिळाल्याने त्यांची देखील कोंडी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)