भोलवडीत 38 महिलांना सिलिंडर वाटप

भोर- भोलावडे (ता. भोर) येथे 38 महिलांना यशराज गॅस एजन्सीतर्फे मोफत गॅस सिलिंडर आणि शेगड्यांचे वाटप करण्यात आले. भारत सरकारची उज्ज्वला योजना ही समाजातील शोषित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील महिलांसाठी वरदान ठरणारी असून, या योजनेतील लाभार्थी महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे. यावेळी जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे प्रमुख पाहुणे म्हणून, तर अध्यक्षस्थानी भोलावडे ग्राम पंचायतीच्या सरपंच कविता थोरात होत्या. यावेळी ओएनजीसीचे अधिकारी विजय पतंगे, राजगड साखर कारखान्याचे संचालक राजेश काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मिलिंद आवाळे, वि. का. सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण सणस, सुनील आवाळे, भोर तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब कुंभार, ग्रामपंचायत सदस्या सविता आवाळे, तंटामुक्तीच्या अध्यक्षा आवाळे, लक्ष्मण भूमकर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)