भोर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी डॉ. विजयकुमार थोरात

भोर- भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांची पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक उपायुक्त पदी बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी डॉ. विजयकुमार थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी डॉ. विजयकुमार थोरात यांच्याकडे पदभार सोपावला.

डॉ. थोरात यापूर्वी शिरूर येथे पाच वर्ष तर दौंड येथे साडेतीन वर्ष मुख्याधिकारी होते. भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे यांच्या हस्ते डॉ. थोरात व मावळते मुख्याधिकारी वारुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश पवार, गटनेते सचिन हर्णसकर, नगरसेवक सुमंत शेटे, नगरसेविका तृप्ती किरवे, आशा रोमण, सह अभियंता संजय सोनवणे, दिलीप भारंबे, लालासाहेब गायकवाड, मनोज राजेशिर्के, किशोरी फणसेकर, पवन बामणे, जगदीश लोखंडे समवेत सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक चंद्रकांत मळेकर यांनी केले. सूत्रसंचालन कार्यालयीन निरीक्षक राजेंद्र राऊत यांनी केले तर विठ्ठल दानवले यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)