भोरमध्ये “बीएसएनएल’ची सेवा विस्कळीत

जोगवडी- भोरमध्ये “बीएसएनएल’च्या झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवसांपासून टेलिफोनची सेवा बंद पडली असून, इंटरनेटची सेवा आज(दि. 31) सकाळपासून बंद झाल्याने बॅंका व शासकीय कार्यालयातील कामे बंद राहिली आहेत. खंडित सेवेमुळे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
बीएसएनएल ग्राहकांसाठी विविध योजना देत असल्याने ग्राहकांची पसंती वाढत आहे, त्यामुळे जिल्हाभरात बीएसएनएलचे जाळे पसरले आहे. शिवाय शासकीय, निमशासकीय कार्यालयांतही बीएसएनएलच वापरले जाते. मात्र, दोन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा एक डोकेदुखी बनली आहे. विस्कळीत झालेल्या या सेवेमुळे ग्राहकांची मोठी पंचायत होत आहे. बॅंकांमधील कामकाज ठप्प झाले आहे, तसेच शासकीय कार्यालयांतील कामेही रेंगाळत चालली आहेत. इतर सेवा उपलब्ध आहेत; परंतु बीएसएनएल कंपनीवरील विश्वास धूसर होत आहे. बीएसएनएलची सेवा ऐनवेळी धोका देत असल्याने ग्राहकांमध्ये याबाबत दिवसेंदिवस नाराजी व्यक्त केली जात आहे. मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद पडल्याने मोबाइल ग्राहकांची गैरसोय होत आहे. नेटकॅफेही बंद पडल्याने अनेकांची कामे ठप्प झाली आहेत, त्यामुळे ही सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकवर्गातून होत आहे.

  • एनजीएन ही नवीन मशीन असून, सीडट या मशीनचे अपडेट नवीन मशीनमध्ये करण्याचे काम चालू होते, यामुळे बीएसएनएल सेवेमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती, याबद्दल आम्ही दिलगिरी आहोत .
    – कुमावत, जेटीओ, बीएसएनएल, भोर
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)