भोरमध्ये निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती

भोर- लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज असून भोर तालुक्‍यातील प्रत्येक मतदान केंद्रावर कर्मचारी पोहचवणे, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन पोहचविण्याठी 42 एस.टी. बस, 64 जीप व 3 ट्रक उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच वेल्हे तालुक्‍यासाठी 15 एस.टी. बस, 50 जीप, 2 ट्रक, मुळशी तालुक्‍यासाठी 35 एस.टी.बस, 42 जीप व 2 ट्रक अशी वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी दिली.

भोर विधानसभा मतदार संघात एकूण 525 मतदान केंद्र आहेत. मतदानासाठी 2 हजार 312 कर्मचारी व 525 शिपाई असे 2 हजार 837 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्‍यात नेटवर्क कनेक्‍टीव्हीटी नसलेल्या 37 मतदान केंद्रांसाठी रणर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सहा ठिकाणी पोलीस विभागा मार्फत वायरलेस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तर दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर व अन्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
भोर विधानसभा मतदार संघात एकूण मतदारांची संख्या 3 लाख 54 हजार 577 आहे. यामध्ये पुरुष मतदार संख्या 1 लाख 87 हजार 221 तर स्त्री मतदारांची संख्या 1 लाख 67 हजार असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली.निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी पोलीस मुख्यालयाकडे 1 उपविभागीय पोलीस अधिकारी, 1 पोलीस निरीक्षक, 20 पोलीस अधिकारी, 200 पोलीस कर्मचारी, 100 गृहरक्षक दलाचे जवान, 20 वाहने, 20 वायरलेस संच देण्याची मागणी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.