भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण संख्येत वाढ

भोर- भोर रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुधारला असून, रुग्णांना आरोग्यविषयक चांगल्या सेवासुविधा खासगी रुग्णालयाच्या तुलनेत अधिक प्रमाणात मिळत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकिय आधिक्षक डॉ. दत्तात्रय बामणे यांनी रुग्णासेवेसाठी इसीजी मशीन, बाल रुग्णांसाठी रेडियंट हिटर, शस्त्रक्रियेसाठी आवश्‍क असलेले पल्स ऍक्‍टोमीटर, तसेच ब्लड प्रेशर तपासणीकामी पाच नवीन मशीन्स उपलब्ध करून दिले असून, रुग्णांच्या आरोग्य तपासणीसाठी उपकरणांची भासत असलेली कमतरता दूर झाली आहे आणि त्यामुळे उपचारासाठी शहरी आणि ग्रामिण भागातील रुग्णांची मानसिकता बदलली असून, रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
बाह्यरुग्ण विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील तीन महिन्यांपूर्वीच तुलनेत हजार ते बाराशेपर्यंत वाढ झाली आहे. या पूर्वीची साधने जुनी असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते, तर रुग्णांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. उपजिल्हा रुग्णालयात आज अनेक प्रकारची अत्याधुनिक साधने उपलब्ध झाली असून, अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे आता सोपे होत असल्याचे डॉ. बामणे यांनी सांगितले.
मागील आठवड्यापासून रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांना आणि नवजात बालकांस रेडियंट हिटर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा लाभ देखील महिला रुग्णांना होत आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. लिंगेश्वर बेरुळे, डॉ. जयश्री मन्नूर, डॉ. स्नेहा ढोरे, डॉ. प्रवीण चौधरी यांसह सर्व परिचारिका, आरोग्य सहायक आणि कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने रुग्णांना उत्तमोत्तम सेवा दिली जात असून, रुग्णालयालयाच्या कारभारात पारदर्शकता आणली जात असल्याचे रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांनी स्पष्ट केले.

  • भोर येथील रुग्णालयात रुग्णांसाठी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नगरपालिकेकडून पुढील काळात नवीन नळ कनेक्‍शन घेण्यात येणार असून, तीन वॉटर प्युरिफायर खरेदी करण्यात येणार आहेत.
    डॉ. दत्तात्रय बामणे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, भोर
  • भोर उपजिल्हा रुग्णालयात इसीजी मशीन, बाल रुग्णांसाठी रेडियंट हिटर, पल्स ऍक्‍टोमीटर, ब्लड प्रेशर तपासणीसाठी पाच मशीन्सची पूर्तता करण्यात आली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)