भोंगे आणि खेळणी विक्रेत्यांना सुगीचे दिवस

लाखो रुपयांची उलाढाल : अनेकांच्या संसाराला हातभार

पुणे – गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव हे दोन उत्सव खेळणी आणि फुगे विकणाऱ्यांसाठी पोटाची खळगी भरणारे आहेत. त्यामुळे दिवस-रात्र मिळेल त्या जागेवर बसून खेळणी विकण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. हातावर पोट असलेल्या या छोट्या व्यवसायिकांना प्रत्येकवेळी पोटाची खळगी कशी भरायची, मुलांचे संगोपन यासह अनेक विघ्न असतात. परंतू, गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या कष्टानंतर हे सर्व विघ्न दूर होत असल्यामुळे या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरही एक समाधानाचे हास्य असते. काही भुरटे व्यवसायिक सोडले तर बहुतांश व्यावसायिक हे प्रामाणिकपणे हा व्यवसाय करत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यासह राजस्थान, मध्य प्रदेश यासह अन्य ठिकाणाहून हे व्यापारी खेळणी विक्रीसाठी येतात. उत्सवात विक्रीतून आलेल्या पैशांवर कुटुंबाचा गाडा चालवला जातो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, याबाबत शनिवार वाडा, डेक्कन आणि नारायण पेठ परिसरातील काही छोट्या व्यवसायिकांशी चर्चा केली असता, “एवढा अट्टाहास कशासाठी’ हे समजते. नगर जिल्ह्यातील एक कुटुंब (दोन लहान मुले आणि नवरा-बायको) गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी पुण्यात दाखल झाले. सावकाराकडून उसणे पैसे घेऊन काही खेळणी विकत घेतली आणि शनिवार वाड्याजवळ दहा दिवसांपासून खेळणी विकून पैसे जमा केले. यावर्षी बाप्पाने चांगला आशीर्वाद दिला. सावकाराचे पैसे फेडून वरची रक्कम पुढील काही महिने तरी पोटाची खळगी भरता येईल असे त्या व्यावसायिकाने सांगितले. राजस्थान येथून आलेला एक व्यक्ती दरवेळी उत्सव आणि यात्रेत फुगे, तोंडाचे मास्क आणि काही खेळणी विकतात. त्यातून मिळणारे पैसे बॅंकेत ठेवून आतापर्यंत दोन मुलींची लग्न केली. अजून दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्यासाठी खूप करायचे असे त्या व्यापाऱ्याने सांगितले.

भोंग्याने शहर हादरले…
यावर्षी गणेशोत्सवात भोंग्याने शहर हादरवून सोडले. भोंग्यांचा आवाज मोठा येत असल्यामुळे तरूणांकडून या भोंग्याला अधिक पसंती मिळाली. त्यामुळे भोंगे विकणाऱ्यांची चांगलीच चांदी झाली. 30 ते 80 रूपयांपर्यंतचे भोंगे बाजारात उपलब्ध होते. रस्त्यावर ठिकठिकाणी भोंगे विक्रीवाले होते. त्यावेळी ग्रुपने आलेले तरूण एकावेळी सहा ते आठ भोंगे विकत घेऊन रस्त्याने मोठ-मोठ्याने भोंगे वाजवत होते. त्यामुळे शेजारून जाणाऱ्याचे कानठळे बसत होते. विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेवर बंदी आणल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी भोंगे वाजवून पोलीस आणि प्रशासनाचा निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)