भैरवनाथ विद्यालयात वृक्षारोपण

मंचर- भैरवनाथ विद्यालय गिरवली (ता. आंबेगाव) येथे स्वच्छतागृह उद्‌घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण व वृक्षदिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
जग्वार लॅंड रोव्हर इंडिया लिमिटेड कंपनीचे वतीने नामदेवराव मोहोळ शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय गिरवली येथे मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी गावांमध्ये वृक्षदिंडी काढली. तसेच विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात गोविंद पाटील, मंदार खोपकर, सतिश गायकवाड, रोहित, सारंग नानोटी ,शुभांगी, उदय दुंडगे, हरीशचंद्र बालघरे, सरपंच विकास गाढवे, गिरवलीचे सरपंच संतोष सैद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ह. भ. प. विकास हगवणे महाराज, अरुण हगवणे, चेअरमन राजश्री सैद, ईश्वर कदम, देवराम सैद, सुभाष ढोरे, मीना सैद, सीमा सैद, रामदास हगवणे, लीला गायकवाड, माजी उपसरपंच कैलास सैद, अनिल सैद, मुख्याध्यापक फापाळे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)