भैय्यूजी महाराजांच्या ताफ्यातील गाडीने एका व्यक्तीला उडवलं?

मुंबई : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज यांच्या ताफ्यातील एका गाडीने कुर्ल्यात एका व्यक्तीला उडवल्याचा आरोप करण्यात येत आहे. फुल व्यावसायिक मनोज गडकरी हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुर्ल्यातील नेहरुनगरमधून भैय्यूजी महाराज यांचा ताफा जात असताना ही घटना घडली. भैय्यूजी महाराज कुर्ल्यातील केदारनाथ मंदिरातील कार्यक्रम आटोपून परतत होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील भरधाव वेगाने जाणाऱ्या एका गाडीचा धक्का रस्ता ओलांडत असलेल्या मनोज गडकरी यांना लागला. या अपघातात मनोज गडकरी हे गंभीर जखमी झाले. मात्र, त्या अज्ञात मोटार चालकाने गाडी न थांबवता, कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता गाडी तशीच पुढे नेली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)