भूषण गगराणी, विकास खरगे मुख्यमंत्री कार्यालयाचे नवे प्रधान सचिव

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल घडवून आणताना सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री कार्यालयातील रिक्त असलेल्या प्रधान सचिवपदी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी आणि वनविभागाचे प्रधान सचिव विकास खरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. निपुण विनायक यांची मुंबई महापालिका प्रशासनाचे आयुक्‍त व संचालक या पदावर नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर सचिन कुर्वे यांच्याकडे महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सनदी अधिकारी ए. ई. रायते यांच्याकडे मुंबईतील विक्रीकर विभागाच्या सहआयुक्‍त पदावर नियुक्ती केली आहे. तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक अमोल येडगे यांच्याकडे अमरावती जिल्हापरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पाठवण्यात आले आहे.

सरदार सरोवर प्रकल्प, नंदूरबारचे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी के. एच. बगाटे यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.