भुजबळ-ठाकरे यांची भेट…

राजकीय चर्चांना आले उधाण
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यात भेट झाली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोच आहे. इतकेच नाही तर छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगल्या गप्पा रंगल्यामुळे राजकीय तर्कांनाही उधाण आले आहे. या दोघांची भेट आणि त्यांच्यात रंगलेल्या गप्पा हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.

एक काळ असा होता की शिवसेना म्हणजे छगन भुजबळांची आक्रमकता. मात्र त्यांनी शिवसेना सोडली आणि बाळासाहेब ठाकरे त्यांचा उल्लेख लखोबा म्हणून करत. शिवसैनिकांनी तर त्यांच्या नावापुढे गद्दार असे विशेषणच जोडले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यातही उभा दावाच निर्माण झाला होता. मात्र अनेक वर्षांनी हे मतभेद मागे सारत हे दोन नेते एकमेकांना भेटले. त्यांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या. छगन भुजबळांना तुरुंगात जावे लागले तेव्हा शिवसेनेने त्यांच्याबाबत सहानुभूतीही व्यक्त केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाथन यांच्या मुलाचे लग्न मुंबईत पार पडले. या लग्नात या दोन्ही नेत्यांसह सगळ्याच दिग्गज नेत्यांची हजेरी होती. मात्र चर्चा रंगली ती उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीचीच. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊतही होते. या दोघांनी कोणत्या विषयावर गप्पा मारल्या हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)