भुगाव शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचना वहीचे वाटप

पिरंगुट- भुगाव (ता. मुळशी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचना वहीचे वाटप करण्यात आले. शिवसेना उपतालुका प्रमुख दीपक करंजावणे यांच्या वतीने या वह्या देण्यात आल्या. शाळेतील 292 विद्यार्थ्यांच्या पालकांना या सूचना वह्या देण्यात आल्या. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे, पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या संघटिका स्वाती ढमाले, पंचायत समिती सदस्य विजय केदारी, शिवसेना तालुका प्रमुख संतोष मोहोळ, सरपंच विजय सातपुते, उपसरपंच जयश्री कुंभार, माजी सरपंच सचिन मिरघे, जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र इंगवले, सुरेखा कांबळे, शिवसहकार सेनेचे तालुका प्रमुख माऊली डफळ, भाऊ हुलावळे, कुलदीप शेडगे, केंद्रप्रमुख सोपान ठकोरे, शहाजी मारणे, मुख्याध्यापक गायकवाड, विशाल पवार, मच्छिंद्र काशिलकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)