भुईंज परिसरातील हॉटेल व्यावसायिकांचा आरक्षणाला पाठिंबा

भुर्ईंज ः पेट्रोल पंप बंद ठेवून व्यावसायिकांनी दिलेला पाठिंबा.

भुईंज, दि. 25 (प्रतिनिधी)- महामार्गावरील पेट्रोल पंप चालकांसह हॉटेल, ढाबे व्यावसायिकांनीही आपले व्यवसाय बंद ठेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.
आनेवाडी टोलनाका ते वेळे गावच्या हद्दीतील पेट्रोल पंप चालकांसह हॉटेल आणि ढाबे चालकांनीही आपले व्यवसाय बंद ठेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाला जाहीर पाठिंबा व्यक्‍त केला आहे. तसेच ओझर्डे परिसरातील गावागावात स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला आहे. हॉटेल आणि पेट्रोल पंप बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. महामार्गावर कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि. बाळासाहेब भरणे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)