भीषण अपघातात दोन ठार

टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून कार दुचाकीवर आदळली
भुईंज, दि. 8 (वार्ताहर) – ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर भुईंज येथील कृष्णा पुलाजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीस्वारासह कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता कारसह दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अक्षय विद्याधर कांबळी आणि संतोष नामदेव माळी अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. दरम्यान, या अपघातात अन्य चारजण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारस घडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)