भीमाशंकर मंदिर रस्त्यावर झाडे कोसळली

माल वाहतूक रस्ता बंद होण्याची शक्‍यता

मंचर- श्रीक्षेत्र भीमाशंकर बसस्थानक ते गुप्त भीमाशंकर मंदिराकडे जाण्यासाठी असणाऱ्या सिमेंट रस्त्यावर टेकडीवरील झाडे, दगडी रविवारी (दि. 28) रात्री अचानक कोसळली आहे. सदर रस्त्याचा उपयोग मंदिराकडे माल वाहतूक करण्यासाठी केला जातो. भाविकांना मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणारा रस्ता सुस्थितीत असून त्याला कोणतीही अडचण नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिमेंट रस्त्याची पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संततधार पावसामुळे डोंगर उतारावरुन दगडे, चिखल रस्त्यावर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास दगड आणि चिखलामुळे माल वाहतुकीसाठी असणारा रस्ता बंद होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भाविकांना मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणारा रस्ता सुस्थितीत असून त्याला कोणतीही अडचण नाही, परंतु भीमाशंकर बसस्थानक ते गुप्त भीमाशंकर मंदिराकडे जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्यांना जो समांतर सिमेंटचा रस्ता केला आहे. त्या रस्त्यावर दगडी आणि चिखल येवून पडल्याने रस्ता बंद होण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर होण्याचा अंदाज स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)