भीमाशंकर कारखान्याचा आदर्श इतर कारखान्यांनी घ्यावा प्रा. पंजाब कथे

मंचर- भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ज्याप्रमाणे साखर कामगारांच्या मुलांसाठी सर्व सोयी उपलब्ध करुन साखर शाळा चालवली आहे.त्याचा आदर्श इतर कारखान्यांनी घ्यावा. तसेच रोटरी क्‍लबच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त गांवे घेऊन त्यांचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन रोटरी क्‍लबचे डिस्ट्रिक्‍ट डायरेक्‍टर प्रा. पंजाब कथे यांनी केले.

पारगाव (ता. आंबेगाव) येथे रोटरी क्‍लब ऑफ नारायणगाव हायवे यांच्या वतीने साखर शाळेला ई-लर्निंग संच प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, रोटरी क्‍लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष बाळासाहेब गिलबिले, डॉ. शिवाजी टाकळकर, श्‍यामराव थोरात, डॉ. श्रीकांत फुलसुंदर, डॉ. योगेश यादव, सुकाजी मुळे, बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, माऊली आस्वारे, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रा. पंजाब कथे म्हणाले की, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने वंचित मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी साखर शाळेत दिलेल्या सुविधा इतर साखर कारखान्यांनी द्याव्यात. त्या माध्यमातून साखर शाळेत उसतोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षणाची गोडी लागून त्याचे भविष्य उज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. साखर शाळेस 7 लाख रुपये किंमतीच्या सरक्षण भिंतीचे भूमिपूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.ऍड. प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी असणारी ही शाळा वर्षभर चालू असते. उसतोडणी हंगामात सुमारे 300 विद्यार्थी असून सध्या 50 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कारखान्याच्या वतीने सर्व शिक्षण सुविधा पुरविल्या जात असून त्यांना सर्वतोपरी शिक्षण देण्याचे काम केले जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.