भीमाशंकरला जाण्यासाठी आता खेडमधून तीन मार्ग

राजगुरूनगर- सहावे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र परिसरात पायऱ्याबरोबरच पर्यायी रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे भीमाशंकरला जाणासाठी आता तीन मार्ग उपलब्ध झाले आहेत. हा पर्यायी मार्गाने व्हीआयपी आणि आजारी वयोवृद्ध भाविकांना दर्शन घेणे सोयीचे झाले आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे यांनी दिली.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत दोन कोटी बजेटच्या सिमेंट रस्ता आणि भीमानदीवर पूल बांधकामे पूर्ण होऊन रस्ता खुला झाला आहे. एसटी बसस्थानक ते थेट मंदिरापर्यंतचा दीड-दोन किलोमीटर रस्ता भीमाशंकर अभयारण्यातून करण्यात आला आहे. पूर्वी हा रस्ता कच्चा खडीकरण केलेला होता. मात्र, अभयारण्याच्या परिसरात पडणाऱ्या पावसामुळे हा रस्ता नादुरुस्त झाला होता. दोन कोटी खर्च करुन तयार केलेल्या रस्त्यामुळे व्हीआयपी व्यक्‍तींचा वेळ आणि होणार त्रास वाचण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आजारी-भाविकांना दर्शनासाठी जाने सुलभ झाले आहे .रस्त्याच्याकडेचे गटार बांधकामे आणि रंगरंगोटी किरकोळ कामे बाकी आहेत. येत्या पावसाळ्यापर्यंत ही कामे मार्गी लागणार असल्याने भाविकांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

देशातील सहावे खेड तालुक्‍यातील भिमाशंकर येथील डाकिण्या भिमाशंकरच्या दर्शनासाठी देशातील भावीक भक्तांसह अभयारण्यामुळे पर्यटक निसर्गप्रेमी तसेच ट्रेकर्स मोठ्या संख्येने भीमाशंकर येथे येत असतात. भिमाशंकर हा परीसर आंबेगाव तालुक्‍यातुन येण्यासाठी एकमेव मार्ग असला तरी खेड तालुक्‍यातूनही भीमाशंकराला जाता येते. मंदिरासह निम्मा भाग खेड तालुक्‍यात येतो. मंदिरापर्यत येण्यासाठी एक किलोमीटर लांबवरुन भाविकांना दगडी सुसज्ज बांधण्यात आलेल्या पाय-यांनी येताना भाविक समाधानाने दर्शनासाठी येताना निसर्गसंपदा आणि परीसर पाहुन खुष होतो. मात्र परतीचा पायऱ्यांचा मार्ग असह्य होतो. ज्येष्ठ वयोवृद्ध भाविकांना डोलीचा नाईलाजास्तव वापर करावा लागत होता. तर व्हीआयपी व्यकतींना ने-आण करण्यामुळे वेळ वाया जाऊन येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांचा त्रास सहन करावा लागत असे.
देवस्थानच्यावतीने शासनाकडे पर्यायी रस्त्याबाबत अभयारण्याच्या परवाणग्या मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा गेली अनेक वर्षापासुन केला जात होता. अखेर युती शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन दोन कोटींचा निधी देण्याबरोबरच रस्त्याचे काम मार्गी लावुन पुर्ण होत आले आहे. तळेघर ते भिमाशंकर पर्यत रस्त्याचे मजबुतीकरणासह डाबंरीकरणाची कामे मार्गी लावल्यामुळे येत्या पावसाळ्यातील रस्ता चागंला झाल्याने निसर्गप्रेमी पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  • पर्यटकांसाठी पर्वणी
    खेड तालुक्‍यातून राजगुरुनगर मार्गे भोरगिरी रस्त्याच्या मजबुती करणाची कामे पूर्ण झाल्याने भाविकांना भीमाशंकरला जाण्यासाठी जवळचे आणि सोयीचे तीन वेगवेगळे रस्ते सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून घाट उताराचे रस्ते उपलब्ध झाले आहे. असंख्य धबधब्यांची मालिका आणि निसर्गातून जाणारे रस्ते आता पर्यटनस्थळे बनू लागली आहे. या मार्गाने डेहणे-नायफड, शिरगाव-मंदोशी आणि टोकोवडे मार्गे कारकुडी असे तीन मार्ग आता खुले झाल्याने भाविकांची आणि पर्यटकांची पर्वणीचे ठरु लागले आहे.
  • भोरगिरीत अनेक कामे मार्गे
    भीमाशंकरच्या पायथ्याशी असलेल्या भोरगिरी गाव शासनाने पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यावर भर दिला आहे. भोरगिरीतील अनेक कामे मार्गी लावली जात आहे. तर भोरगिरी ते भीमाशंकर हा रस्ता चागंला झाला आहे. अनेक पर्यटक भाविक या मार्गाने येऊन पर्यटनाचा आनंद घेऊ लागले आहे. रस्ता संपल्यानंतर एक किलोमीटर अभारण्याच्या जगंलातून पायी ये-जा करुन निसर्गाचा आणि भक्‍तीचा आनंद घेऊन एक दिवसाची कुंटुबाची सहली आता पुणे चाकण परिसरातील नोकर चाकरदार वर्ग घेऊ लागला आहे.
  • भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचा पायवाट मार्गाला पर्यायी सिमेंट रस्ता झाल्यामुळे अनेक भाविक चारचाकी, दुचाकी घेऊन वाहतुकीला अडथळा ठरणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच एकेरी आणि अरुंद रस्ता असल्याने भाविक अडकून पडू नये म्हणून या रस्त्यावर लोखंडी गेट बसवून कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. व्हीआयपी आणि ज्येष्ठ वयोवृद्ध, आजारी आदि भाविकांनाच या गेटमधून आत सोडले जाणार आहे. तसेच मंदिर परिसरात गर्दी होऊन धोकादायक परिस्थिती होणार नाही याची सर्वोतोपरी दक्षता घेतली जाणार आहे.
    – सुचित्रा आमले, पदसिद्ध सचिव, भीमाशंकर देवस्थान तथा तहसीलदार, खेड तालुका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.