भिमाई स्मारक पुर्णत्वासाठी समिती स्थापन करणार

सुभाष पारधी : न्याय भवनाचे लवकरच उद्घाटन
सातारा,दि.31 प्रतिनिधी- विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मातेचे भव्य स्मारक व्हावे यासाठी शासनाने लागेल तेवढा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, स्मारक आराखड्याबाबत भिमाई स्मारक समिती व शासन यांच्यात एकमत होत नसल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून भिमाई स्मारकाच्या पुर्णत्वासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी यांनी सांगितले. दरम्यान, सामाजिक न्याय भवनाचे काम पुर्णत्वाकडे तेथील अतिक्रमणांचा प्रश्‍न मार्गी लागताच उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्हा अनुसुचित जाती मोर्चा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीचे आयोजन प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. आढावा बैठकीनंतर सुभाष पारधी यांनी नियोजित भिमाई स्मारकाच्या ठीकाणी जावून अभिवादन केले. यावेळी अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष व नगरसेवक मिलींद काकडे, नगरसेवक धनंजय जांभळे, माजी जिल्हापरिषद सदस्य संदिप शिंदे, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, अमोल कांबळे, विक्रांत भोसले आदी.उपस्थित होते.
यावेळी बोलताना पारधी म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात आलेल्या वास्तूंचा विकास करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. यापुर्वी लंडन येथील घर तसेच मुंबई येथे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मीलची जागा हस्तांतरित करण्यात आली. त्याप्रमाणे साताऱ्यातील भीमाई स्मारक देखील पुर्ण होणे हा निर्धार भाजपने केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ग्रंथालय निर्मितीसाठी सरकारने 50 लाख रूपयांचा निधी दिला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा रहिवास असलेले सदरबझार, सातारा येथील निवासस्थान देखील सरकारने घेण्यासाठी पुढाकार घेतला मात्र, तो विषय न्यायप्रविष्ठ झाला आहे परंतु तरी ही सरकारने जागा मालकास रेडीरेकनरप्रमाणे जागेचा मोबदला देण्याची तयारी दर्शविली असून तो देखील प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहणार आहे.

भाजपला सर्वाधिक मते मिळणार
समाजात अनुुचित घटना घडवून समाजात दरी निर्माण करण्याचे काम विरोधक करित आहेत. मात्र, आता अनुसुचित जातीमधील समाज शिक्षणाव्दारे सुशिक्षित झाला आहे तसेच त्यांच्या हाती स्मार्ट फोन आल्यामुळे चांगले आणि वाईट यातील फरक ओळखू शकत आहेत. भाजप सरकारने अनुसुचित जातीसाठी कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणूकीत अनुसुचित जाती मतदार हा बहुसंख्यने भाजप सोबतच राहिल व 2019 मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी व मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील असा दावा सुभाष पारधी यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)