भिंगारमध्ये गळफास घेवून एकाची आत्महत्या

नगर – भिंगारमध्ये राहत्या घरात गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी फिर्यादी दिपक ओमप्रकाश कंडारे (रा. शाहुमहाराज हौसिंग सोसायटी ता.जि.अ.नगर ) याच्या मयत भाऊ महेश ओमप्रकाश कंडारे याला आरोपी अभिलेख धमेंद्र वाघेला व दिपक सुभाष वाघेला यांनी दि.20 मार्च रोजी विनाकारण शिवीगाळ करून तुझ्याकडे व तुझ्या भावाकडे पाहतो असा दम दिला. याच मानसिक तणावामध्ये व धमकिच्या दबावामध्ये फिर्यादीचा भाऊ महेश कंडारे याने 16 एप्रिल रोजी रात्री 7.30 ते 10.45 वाजण्याच्या दरम्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी मयत महेश कंडारे याचा भाऊ दिपक कंडारे याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)