भारत हा आता जागतिक मॅन्युफॅक्‍चरिंग हब – मोदींचा दावा

कम्पाला – भारत हा आता जागतिक मॅन्युफॅक्‍चरिंग हब बनत असून आम्ही पुर्वी ज्या देशांकडून मोटार कार आणि मोबाईल फोन आयात करीत होतो त्याच देशाना आम्ही आता मोटार कार आणि मोबाईल फोन अशा भारतात तयार झालेल्या वस्तुंची निर्यात करीत आहोत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

युगांडाच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या भारतीयांच्या एका मेळव्यात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. आज लोहमार्ग, मेट्रो ट्रेनचे डबे, उपग्रह इत्यादींची भारतातच भारतीय स्टील वापरून निर्मीती होत आहे. त्यामुळे भारत हा आता मॅन्युफॅक्‍चरिंग हब बनू लागला आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की सॅमसंग कंपनीने भारतात उत्तरप्रदेश येथे सर्वात मोठ्या मोबाईल फोन निर्मीतीचा कारखाना उभारण्याचा प्रकल्प सुरू केला आहे त्यामुळे आता कदाचित पुन्हा युगांडात तुम्ही जेव्हा मोबाईल फोन खरेदी कराल तेव्हा त्यावर मेड ईन इंडिया असे लिहीलेले असेल असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेड इन इंडिया हा आता एक मोठा ब्रॅंड झाला आहे असेही त्यांनी नमूद केले. भारतात स्टार्टअप बिझीनेसही जोरात सुरू असून गेल्या चार वर्षात 11 हजार स्टार्टअप बिझनेस रजिस्टर झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.भारत आणि युगांडांचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्‍वास व्यक्त करून मोदी म्हणाले की भारताने अफ्रिकेतील 18 देशांमध्ये नवीन दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अफ्रिकेतील भारतीय दूतावासांची संख्या आता 47 इतकी होईल.

भारत आणि अफ्रिकेतील व्यापारात 32 टक्के वाढ झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. युगांडाच्या विकासात भारतीय नागरीकांनी दिलेल्या योगदानाचेही मोदींनी कौतुक केले. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात आपण युगांडाच्या दौऱ्यावर आलो होतो त्याचीही आठवण मोदींनी यावेळी नमूद केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)