भारत शांतताप्रिय देश आहे परंतु …..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ द्वारे देशाला संबोधित केले. या कार्यक्रमाचा हा ४८ वा भाग होता. आजच्या संबोधनात त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. काल शनिवारी रात्रीच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानच्या दहशतवादाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते.

पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून पाकिस्तानला थेट संदेश दिला की, जे आमच्या देशाच्या शांती आणि प्रगतीचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न  करेल अश्या वृत्तींना भारतीय लष्कर खपवून घेणार आंही आणि हे स्पष्ट आहे की भारतीय लष्कर त्याला सडेतोड उत्तर देईल. पंतप्रधानांनी सांगितले की, आम्ही शांततेवर विश्वास ठेवणारे आहोत परंतु ते आत्मसन्मानाच्या किमतीवर कधीच नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान पुढे म्हणाले, भारतसदैव शांततेच्या प्रति वचनबद्ध राहिला  आहे. २० व्या शतकातील दोन्ही महायुद्धात भारताच्या लाखो सैनिकांनी शांततेसाठी सर्वोच्च बलिदान दिले. आजही संयुक्त राष्ट्राच्या अनेक शांती रक्षक सेनेच्या तुकड्यात सर्वाधिक सैनिक पाठवणाऱ्या देश्यांच्या यादीत ‘भारत’ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)