भारत वि. इंग्लंड चौथा कसोटी सामना, पहिला डाव – इंग्लंड सर्वबाद २६४, भारत बिनबाद १९

साऊथहॅम्पटन :मालिकेवर वर्चस्व गाजविणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रभावी मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजविले. त्यामुळे आज सुरू झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची पहिल्या डावांत घसरगुंडी झाली.  त्यांचा संपूर्ण डाव २४६ धावांवर आटोपला. सॅम करन आणि मोईन अली यांनी डाव सावरला. सॅम करनने ७८ धावांची झुंजार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताची धावसंख्या बिनबाद १९ अशी आहे.  केएल राहुल ११ तर शिखर धवन ३ धावांवर खेळत आहेत.

चहापानापर्यंत  कसोटी सामन्यावर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व होते परंतु त्यानंतर तळाच्या फलंदाजांना लवकर बाद करण्यात गोलंदाजांना अपयश आले. भारताकडून जसप्रीत बुमराह याने ३ बळी मिळवले तर इशांत शर्मा , रविचंद्रन अश्विन  आणि  मोहंमद शामी यांनी प्रत्येकी  डॉन खेळाडू बाद केले. तर हार्दिक पांड्याने १  खेळाडू बाद केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याआधी काल सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळपट्टी पाहून इंग्लंडने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. जसप्रीत बुमराहने कीटन जेनिंग्जला शून्यावर पायचित करून इंग्लंडच्या घसरगुंडीची सुरुवात केली. पाठोपाठ ईशांतने जो रूटला (4) बाद करीत भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. बुमराहने बेअरस्टोला (6) तर पांड्याने कूकला (17) बाद करीत इंग्लंडची 4 बाद 36 अशी अवस्था केली.

बेन स्टोक्‍स (23) व जोस बटलर (21) यांनी पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भर घातली. महंमद शमीने बटलर व स्टोक्‍स यांना बाद करीत इंग्लंडची 6 बाद 86 अशी घशरगुंडी घडवून आणली. परंतु सॅम करन व मोईन अली यांनी पुन्हा एकदा इंग्लंडचा डाव सावरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)