भारत-चीनपुढे एकत्रित कार्य करण्यासाठी मोठी संधी – मोदी

शी जिनपिंग यांच्याशी फलदायी अनौपचारिक परिषद
वुहान – भारत आणि चीन यांच्यातील अतिशय जुन्या संबंधांची प्रशंसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोन्ही देशांपुढे एकत्रित कार्य करण्यासाठी मोठी संधी असल्याचे म्हटले. मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात येथे फलदायी अनौपचारिक परिषद झाली.

या परिषदेचा भाग म्हणून मोदी आणि जिनपिंग यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा झाली. अशाप्रकारच्या अनौपचारिक परिषदा भारत आणि चीनमधील परंपरांचा भाग बनाव्यात. अशी परिषद 2019 मध्ये भारतात झाल्यास मला आनंद वाटेल. जगाच्या लोकसंख्येच्या 40 टक्के घटकांसाठी कार्य करण्याची जबाबदारी भारत आणि चीनवर आहे. आपल्या जनतेबरोबरच संपूर्ण जगाच्या भल्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची व्यापक संधी दोन्ही देशांना आहे, अशा भावना यावेळी मोदींनी व्यक्त केल्या. चीनच्या राजधानी (बीजिंग) बाहेर जिनपिंग यांनी स्वागत केलेला मी भारताचा पहिलाच पंतप्रधान ठरलो, असे म्हणत मोदी यांनी त्यांचे आभार मानले. दोन्ही देशांतील जनतेच्या संपर्कावर भर देताना त्यांनी विविध क्षेत्रांचा समावेश असणाऱ्या स्ट्रेंथ या शब्दाचा वापर केला. तर अलिकडच्या काही वर्षांत भारत आणि चीनने निकटची मैत्री स्थापिक करून सकारात्मक प्रगती केल्याचे जिनपिंग यांनी म्हटले.

मागील वर्षी भारत आणि चीनच्या लष्करांमध्ये तब्बल 73 दिवसांचा डोकलाम पेच उद्भवला. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर काहीसा प्रतिकूल परिणाम झाला. यापार्श्‍वभूमीवर, द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा आणि परस्परविश्‍वास वाढीस लावण्याचा प्रयत्न म्हणून दोन्ही देशांच्या अनौपचारिक परिषदेकडे पाहिले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले मोदी ह्यांनी एक गोष्ट लक्षात ग्यावी कि त्यांनी जे विचार व्यक्त केले आहेत ते शी जिनपिंग ह्या चिनी नेत्या समोर ते भारतीय नाहीत कि ज्यांना शब्दाची भुरळ पाडता येईल वरील इछा आपले भारतीय मंत्री गेली अनेक वर्षे उराशी बाळगून आहेत त्यासाठी नेहरूंनी अश्रू सुद्धा ढाळलेत हे जगाला माहित आहे तेव्हा पासून दोन्ही देशात ज्या बैठका झाल्यात , होत आहेत त्याचे वर्णन जोर बैठका , दंड बैठका , उठाबशा ,अथवा संपूर्ण नमस्कार इतपतच चीनच्या दृष्टीने त्याला महत्व देण्यात येते त्यांचे ध्येय ठरलेले आहे व त्यात सुतराम फरक होण्याची शक्यता नाही ह्यात भारतीय मंत्र्यांचा एकच फायदा होतो कि त्यांना ह्या कारणाने विदेश वार्या करायला मिळतात तेही जनतेच्या पैशावर गेल्या भारत चीन युद्धात चिनी लष्कराने एकतर्फी युद्धबंदी जाहीर करून माघार घेतली त्यावेळी एका जपानी वार्ताहराने माओ तेस तुंगला चिनी लष्कर भारतीय लष्कराला घाबरून माघारी गेले काय ? म्हणून प्रश्न केला तेव्हा माओ म्हणाला भारत जिंकणे हा केवळ एक दिवसाचा सवाल आहे कारण ज्याला विकत घेता येत नाही असा एकही नेता भारतात उरलेला नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)