भारत-केनिया औद्योगिक संबंध वाढणार

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली: भारत-केनिया यांच्यादरम्यान केनियाची राजधानी नैरोबी येथे या आठवड्यात आठवी संयुक्त व्यापारी बैठक झाली. केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि केनियाचे उद्योग आणि व्यापार मंत्री पीटर मुनिया यांनी संयुक्तपणे या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.

या बैठकीत केनियातील अन्नसुरक्षा, परवडणारी घरे, सार्वजनिक आरोग्यसुविधा आणि उत्पादन क्षेत्र, द्विपक्षीय व्यापार विस्तार अशा चार महत्त्वाच्या विषयांवर भारताच्या योगदानाविषयी चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असल्याचे प्रभू यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याशिवाय, आंतरराष्ट्रीय सौर भागीदारीत समाविष्ट होण्यासाठी केनियाचा होकार, ऊर्जा क्षेत्रासह, विविध क्षेत्रांसाठी भारताने केनियाला देऊ केलेल्या 220 दशलक्ष कर्जाच्या अंमलबजावणीचा मुद्दा आणि भारताकडून विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मिळणारे प्रशिक्षण अशा व्यापक विषयांवर चर्चा झाली. या बैठकीतील निर्णयावर दोन्ही मंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यात. त्याशिवाय यावेळी, भारत केनिया संयुक्‍त व्यापार परिषदेचीही बैठक झाली.

या बैठकीत, सुरेश प्रभू यांनी केनियाच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार संशोधन आणि डिझाईन केलेली उत्पादने विकसित करण्याची सूचना भारतीय उद्योजकांना केली. द्विपक्षीय व्यापार अधिक वृद्धिंगत होण्यासाठी प्राधान्यक्रमांचा विचार केला जावा, असेही ते म्हणाले. प्रभू यांनी या दौऱ्यात भारतीय समुदायांच्या लोकांशीही संवाद साधला. भारत सरकारच्या विविध विकासप्रकल्पांची त्यांना माहिती दिली.

आपल्या भेटीदरम्यान प्रभू यांनी केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहरु केनयत्ता आणि उप राष्ट्राध्यक्ष विलियम रुतो यांचीही भेट घेतली. सुरेश प्रभू यांच्यासोबत भारतीय उद्योजकांचे शिष्टमंडळही या दौऱ्यावर गेले होते. भारत आणि केनिया यांच्यात दीर्घकालीन संबंध असून सध्या भारत केनियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि दुसऱ्या क्रमांकाचा गुंतवणूकदार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)