भारत आणि साओ टोमे आणि प्रिन्सीप यांच्यात सामंजस्य करारास मंजूरी

नवी दिल्ली – वनौषधी क्षेत्रात भारत आणि साओ टोमे यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळापने पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली आहे. 14 मार्च 2018 ला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

जैवविविधतेच्या संदर्भात, भारत हा जगातला एक समृद्ध देश आहे. 17000-18000 पुष्प वनस्पतींपैकी 7000 पेक्षा जास्त वनस्पतींचा आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमीओपॅथी सारख्या उपचार पद्धतीत उपयोग केला जातो. सुमारे 1178 वनौषधींचा व्यापार करण्यात येतो त्यापैकी 242 प्रजातीचा वार्षिक 100 मेट्रीक टनापेक्षा जास्त वापर केला जातो. वनौषधी या पारंपरिक औषध पद्धतीचा मोठा भाग आहेतच त्याचबरोबर या वनौषधी मोठ्या प्रमाणात लोकांना आरोग्य सुरक्षा आणि उपजीविकेचे साधनही पुरवितात.

पारंपरिक आणि पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करण्याकडे जागतिक कल वाढला असून, सध्या 120 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर असणारा जागतिक वनौषधी व्यापार, 2050 पर्यंत 7 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्सवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
जागतिक आरोग्य संघटनेबरोबर विज्ञापन कराराची माहिती आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीत्व, आग्नेय आशिया क्षेत्रीय कार्यालयाच्या भारतातल्या कार्यालयामार्फत करण्यात आले. नवी दिल्लीत 13 मार्च 2018 रोजी या ज्ञापन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. यामुळे भारत आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यातल्या सहकार्याला प्रोत्साहन मिळणार आहे. परिणामी भारतातल्या सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचावायला मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)