भारत अ संघाची भारत ब संघावर मात

 जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे – भारत अ मुलांच्या संघाने भारत ब संघावर 4-1ने मात करताना जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्‍यपद स्पर्धेत आगेकूच केली. महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू आहे.

आजच्या पहिल्या लढतीत भारत अ संघाकडून दुहेरीत अक्षत सोनी-देवांश वर्मा जोडीने मिहीर-नमराज जोडीवर 21-13, 21-15 असा विजय मिळवला, तर प्रियांश चौधरी-यशराज पांडे जोडीने अभिमन्यू-अर्णव जोडीवर 21-0, 21-0 अशी मात केली. एकेरीत अक्षतने मिहीरवर 10-21, 21-15, 21-15 असा विजय मिळवून भारत अ संघाला 3-0 ने विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतर देवांश वर्माने अर्णवचे आव्हान 21-23, 21-18, 21-13 असे परतवून लावले. अखेरच्या लढतीत भारत ब संघाच्या नमराजने यशराज पांडेवर 21-12, 16-21, 21-10 असा विजय मिळवला.

मुलींच्या गटात जॉर्जियाची भारत अ संघावर मात

शालेय मुलींच्या गटात जॉर्जिया संघाने भारत अ संघावर 5-0ने मात केली. यात दुहेरीत निनो -लिली जोडीने कैफी गर्ग-प्रांजल पाठक जोडीवर 21-13 21-5 अशी, लिझी-केटी जोडीने इती पांडे-वंशिका के. जोडीवर 21-0, 21-0 अशी मात केली. एकेरीत लिलीने कैफीवर 21-5, 23-21 असा, तर निनोने प्रांजलवर 21-12, 21-5 असा विजय मिळवला. अखेरच्या लढतीत केटीने वंशिकाचे आव्हान 21-19, 21-14 असे 21 मिनिटांत परतवून लावले आणि जॉर्जियाला निर्भेळ यश मिळवून दिले.

सिलेक्‍टेडमध्ये भारत ब संघाचा विजय

सिलेक्‍टेड टीममध्ये मुलींच्या गटात भारत ब संघाने इंग्लंडचे आव्हान 4-1 ने परतवून लावले. यात इंग्लंडच्या लीह अलन-नताशा लाडो जोडीने व्ही. श्री कोकनट्टी -अनिशा वसे जोडीवर 23-21, 21-10 अशी मात केली. यानंतर तनिष्का देशपांडे-वर्षा वेंकटेश जोडीने मेगन थॉमस-अँजेलिना वॉंग जोडीवर 21-3, 21-8 अशी मात करून भारताला बरोबरी साधून दिली. एकेरीत तनिष्काने अँजेलिनावर 21-4, 21-7 अशी सहज मात केली, तर अनिशाने नताशावर 21-12, 18-21, 21-13 असा विजय मिळवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एकेरीतील अखेरच्या लढतीत वर्षाने लीहवर 21-9, 21-11 अशी मात केली.

निकाल – शालेय गट – मुली – बल्गेरिया – 5 वि. वि. भारत ब – 0 (असाया-व्हेलेंटिन वि. वि. खुशी मैथिली 21-7, 21-16, व्हिक्‍टोरिया-मिहाएला वि. वि. रुची-श्रुती 21-5, 21-8, व्हॅलेंटिना-मैथिली 21-5, 21-10, मिहाएला वि. वि. खुशी 21-5, 21-5, व्हिक्‍टोरिया वि. वि. श्रुती 21-4, 21-5)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)