भारतीय हॉकी संघाचा मनप्रीत सिंग कर्णधार 

चॅम्पियन्स करंक हॉकी स्पर्धा 
नवी दिल्ली: मस्कत येथे 18 ऑक्‍टोबरपासून सुरू होत असलेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या अठरा सदस्यीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून या संघाचे नेतृत्व पी.आर. श्रीजेशऐवजी अनुभवी मध्यरक्षक मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे.
अनुभवी आणि दिग्गज खेळाडू सरदार सिंगच्या निवृत्तीनंतर भारत प्रथमच मोठ्या स्पर्धेत सहभागी होत आहे. भारतीय संघाने 2016 मध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 3-2 असा पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात अनेक बदल केले गेले असुन चिंगलेनसाना सिंगकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तर श्रीजेशच्या साथीत युवा गोलरक्षक क्रिशन बहादुर पाठकचा संघात समावेश करण्यात आला आहे.कोठाजित सिंग खडंगबम हा बचावपटू संघात बऱ्याच अवधीनंतर पुनरागमन करणार आहे.
यावेळी 20 वर्षीय खेळाडू हार्दिक सिंगच्या साथीत हरमनप्रीत सिंग, गुरिंदर सिंग, वरुण कुमार, सुरेंदर कुमार आणि जरमनप्रीत सिंग यांच्या खांद्यावर भारतीय संघाच्या बचावाची जिम्मेदारी असून कर्णधार मनप्रीत सिंग, सुमित शर्मा, ललित कुमार उपाध्याय, चिंगलेनसाना सिंग यांच्या कडे मध्यरक्षकाची जबाबदारी आहे. आक्रमणाची जबाबदारी आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग, मनदीप सिंग आणि दिलप्रीत सिंग यांच्यावर आहे.
भारतीय हॉकी संघ – 
गोलरक्षक – पी.आर.श्रीजेश व क्रिशन बहादुर पाठक.
बचावपटू – हरमनप्रीत सिंग, गुरिंदर सिंग, वरुण कुमार, कोठाजित सिंग खडंगबम, सुरेंदर कुमार, जरमनप्रीत सिंग व हार्दिक सिंग.
मध्यरक्षक – मनप्रीत सिंग (कर्णधार), सुमित नीलकंठ शर्मा, ललित कुमार उपाध्याय, चिंगलेनसाना सिंग कांगुजाम (उपकर्णधार).
आघाडीवीर – आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)