भारतीय हद्दीत घुसलेले पाकिस्तानी हेलिकॉप्टर लष्कराने पिटाळले 

पूंछ (जम्मू-काश्‍मीर): भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी हेलिकॉप्टरला लष्कराने त्वरित कारवाई करून परत पिटाळले आहे. रविवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. पूंछ विभागात एलओसी (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) च्या आसपास भारतीय हद्दीत एक पाकिस्तानी हेलिकॉप्टर घुसलेले आढळून आले. आपल्या हद्दीत घुसलेले पाकिस्तानी हेलिकॉप्टर पाहून भारतीय लष्कराने ताबडतोब कारवाई करत त्यावर आक्रमण केल्याने ते हेलिकॉप्टर पुन्हा पाकिस्तानी हद्दीत परतून गेले. या घटनेनंतर सुरक्षा दलाला सतर्कतेचे इशारे देण्यात आली असून हे हेलिकॉप्टर भारतात येण्याच्या कारणांचा शोध घेणे चालू आहे.
राष्ट्रसंघात भारताने पाकिस्तानला धारेवर धरले असण्याच्या काळातच पाकिस्तानी हेलिकॉप्टरचे भारतीय हद्दीत अतिक्रमण झालेले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राष्ट्रसंघात पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड करत म्हटले की, भारत पाकिस्ताशी चर्चेस तयार आहे, परंतु दहश्‍तवाद आणि चर्चा एकाच होऊ शकणार नाहीत. पाकिस्तानात आजही दहशतवादी राजरोसपणे फिरत आहेत. पाकिस्तानच्या हरकतींमुळेच भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतिवार्ता होऊ शकत नाही, हे स्वराज यांनी दाखवून दिले आहे.
भारत लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा दुसरा वाढदिवस साजरा करत असताना त्याच दिवशी पाकिस्तानी हेलिकॉप्टरने भारतीय हद्दीत घूसखोरी केली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)