भारतीय लष्कराने पाकला हरवले, रशियन लष्कराच्या “भारत माताकी जय’ घोषणा

चेलियाबिंस्क (रशिया) – भारतीय लष्कराने व्हॉलीबॉल सामन्यात पाकिस्तान लष्कराच्या व्हॉलीबॉल संघाला पराभूत केले. एससीओ (शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन) आयोजित दहशतवाद विरोधी युद्धसराव चालू आहे. त्यात सहभागी 9 राष्ट्रांच्या लष्करांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय लष्कर विजेता ठरले. त्याने पाकिस्तानचा पराभव केला. भारताची 5 राजपूत रेजिमेटने विजय मिळवल्यानंतर रशियाने मोठा आनंद व्यक्त केला आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. मॉस्कोतील भारतीय दूतावासाने ट्‌विटरवर याची माहिती दिली आहे.

स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तानने परस्परांच्या संघांना “चीअर’केल्याचीही माहिती देण्यात आली आहे. या युद्धसरावात भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या सुमारे 200 जवानांनी भाग घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत आणि पकिस्तानबरोबरच रशिया, चीन, किरगीझ गणराज्य,कझाकस्तान, तजकिस्तान, आणि उझबेकिस्तानचे संघ सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)