भारतीय महिला क्रिकेट संघाचे हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व

महिला टी-20 विश्‍वचषकासाठी संघ जाहीर

मुंबई: नोव्हेंबर महिन्यात कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या महिला टी-20 विश्‍वचषकासाठी बीसीसीआयने आज भारतीय महिला संघाची घोषणा केली असून 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपविण्यात आले आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये धावांचा रतीब घालणारी महाराष्ट्राची स्मृती मंधाना संघाची उपकर्णधार असणार असून या संघात मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्जलाही संधी मिळाली आहे. 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघाचा या स्पर्धेत ब गटात समावेश करण्यात आला असून या गटात भारतीय महिलांना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड या संघांचा सामना करावा लागेल. स्पर्धेत भारतीय महिलांचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध 9 नोव्हेंबर रोजी होणार असून दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी तिसरा सामना आयर्लंडविरुद्ध 15 नोव्हेंबरला, तर चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान सध्या भारतीय महिला संघ श्रीलंका दौऱ्यावर असून या दौऱ्यात भारतीय संघाने श्रीलंकेला व्हाईटवॉश देताना पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी आपल्या खिशात घातली आहे.

महिला विश्‍वचषकासाठी भारतीय महिला संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्‍त, हेमलता, मानसी जोशी, पूजा वस्त्रकार व अरुंधती रेड्डी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)