भारतीय महिलांसमोर मालिका विजयाचे आव्हान

वेलिंग्टन: न्यूझीलंड विरुद्धची एकदिवसीय मलिका 2-1 अशा फरकाने जिंकल्यानंतर आता टी- 20 मालिकाही जिंकण्याचे लक्ष्य ठेवून भारतीय महिला संघ मैदानात उतरणार आहे. एकदिवीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत अखेरच्या सामन्याअगोदरच भारतीय महिला संघाने मालिका जिंकली होती; परंतु तिसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पहिला टी- 20 सामना जिंकून टी- 20 मालिकेची सुरुवात विजयाने करण्यास महिला संघ उत्सुक असेल.

मागील वर्षी झालेल्या टी – 20 विश्वचषकात भारतीय महिला संघाला इंग्लंड विरुद्ध उपान्त्यफेरीच्या सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्या सामन्यात मिताली राजला संघातून वगळण्यात आल्याने त्यावेळचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि तिच्यातील वाद चांगलाच उफाळून आला होता. त्यानंतर भारतीय महिला संघाचा हा पहिलाच टी- 20 सामना आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात स्मृती मंधनाने 90 आणि 105 धावांच्या खेळी केल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर मंधानाने मालिकावीराचा किताब पटकाविला होता. तर तिसऱ्या सामन्यात मंधाना लवकर बाद झाल्याने भारतीय संघाला जास्त धावा फलकावर लावता आल्या नाहीत आणि भारतीय संघाने सामना गमविला. त्यामुळे तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. टी- 20 संघची कर्णधार हरमनप्रीत कौर एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करू शकले नव्हती. तिने चांगली कामगिरी करत संघासमोर आदर्श ठेवण्याची गरज आहे. विश्वचषकातील इंग्लडविरुद्धच्या पराभवात तानिया भाटिया ही मंधानासह सलामीला आली होती; परंतु त्यानंतर जेमिमा रॉड्रीग्जने सलामीवीर म्हणूनही स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्याही खेळीकडे असतील.

गोलंदाजीमध्ये वेदा कुष्णमूर्थीला खराब प्रदर्शनामुळे संघातील स्थान गमवावे लागले आहे. तिच्याऐवजी संघात स्थान मिळविणारी प्रिया पुनिया या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करण्याची शक्‍यता आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या मागील 8 टी- 20 सामन्यांत भारताने 3 सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने 5 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे टी- 20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा संघ भारतासमोर आव्हान उभे करू शकतो.

भारतीय संघ – हरमनप्रीत सिंग (कर्णधार), स्मृती मंधना, मिताली राज, जेमिमा रोड्रिगेज, दीप्ती शर्मा, तानिया भाटीया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिश्‍त, डी. हेमलता, मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, प्रिया पुनिया.
न्यूझीलंडचा संघ- ऍमी, सदरवेट (कर्णधार), सुझी बेट्‌स, बर्नाडायीन बेझुइनहोउट, सोफी डीवाइन, हायले जेसेन, केटलिन गुर्री, लेघ कस्पेरेक, अमेलिया केर, फ्रानसेस मेकेय, केटी मार्टीन, रोसमेरी मेर, हन्नाह रोव, ली तहुहु.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)