भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने बोगसगिरी करणाऱ्यांवर कारवाई करा

मेढा ः सपोनि. जीवन माने यांना निवेदन देताना एकनाथ रोकडे, दशरथ कांबळे, संतोष चव्हाण, जयसिंग रोकडे आदी मान्यवर. (छाया ः शशिकांत गुरव, मेढा)

मेढा, दि. 29 (प्रतिनिधी) – पदाधिकारी नसताना भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेच्या नावाने जावली तालुक्‍यात अनधिकृत काम करणाऱ्या बोगस कार्यकर्त्यांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी तालुकाध्यक्ष दशरथ कांबळे यांनी केली आहे.
नुकतीच भारतीय बौद्ध महासभा जावली तालुक्‍याची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून तालुकाध्यक्षपदी दशरथ कांबळे व तालुका कार्यकारिणी यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष धिरज जाधव यांनी केली असून इथून पुढे जावली तालुक्‍यात वरील कार्यकारणी सक्रियपणे धार्मिक काम धम्माचा प्रचार व प्रसार अतिशय जोमाने करत आहे.
अधिकृत संस्थेशिवाय भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने दुसऱ्या कोणालाही जावली तालुक्‍यात अनधिकृत काम करता येणार नाही. संस्थेच्या नावाने कार्यक्रम, प्रसिद्धीपत्रक, पावती पुस्तके, मंगल परिणय प्रमाणपत्रे कोणीही देऊ नये. तसे आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा कांबळे यांनी दिला आहे. याबाबत मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि. जीवन माने यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी आरपीआय जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष धिरज जाधव, तालुकाध्यक्ष दशरथ कांबळे, सचिव संतोष चव्हाण, जयसिंग रोकडे, वसंत चव्हाण गुरुजी, विकास तात्या जाधव, प्रवीण कांबळे, विजय गंगावणे, वामनराव जगताप, श्रीरंग कांबळे, दत्तात्रय जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यामध्ये नवीन जावली पॅटर्न तयार करून भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या बाबासाहेबांच्या मातृ संघटना एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आरपीआयचे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)