भारतीय नागरीकाची वर्षभराने सुटका

लाहोर – वर्षभरापुर्वी चुकुन पाकिस्तानी हद्दीत गेलेल्या एका भारतीय नागरीकाची पाकिस्तानने सुटका केली असून आज त्याला वाघा बॉर्डर वर भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले. दलवंदरसिंग असे त्याचे नाव असून तो 23 वर्षांचा आहे.

6 मार्च 2017 रोजी तो पाकिस्तानी हद्दीत चुकुन घुसला होता. तो तेथून लाहोरपासून 50 किमी अंतरावरील बल्लनवाला गावात पोहचला होता. तेथे त्याला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. पण पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मात्र त्याला कधी अटक केली आणि किती दिवस तो पाकिस्तानी पोलिसांच्या ताब्यात होता याची माहिती दिली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन्ही देशांचे नागरीक बऱ्याचवेळा चुकीने एक दुसऱ्या देशांच्या हद्दीत घुसतात. पण अशा नागरीकांना परत करण्याविषयीची कोणतीही कायदेशीर चौकट उपलब्ध नसल्याने अशा नागरीकांच्या सुटकेला विलंब होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)