भारतीय खाद्यपदार्थांना जागतिक मान्यतेसाठी प्रयत्न 

नवी दिल्ली – विविध प्रकारच्या भारतीय खाद्यपदार्थांना जागतिक स्तरावर मान्यता मिळावी यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड इंटरप्रिनरशिप ऍण्ड मॅनेजमेंट (एनआयएफटीईएम) या संस्थेने मंजूर केलेल्या उत्पादनांची चाचणी आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये केली जाणार आहे. त्यासाठी अन्न प्रक्रिया मंत्रालय पुढाकार घेत असल्याची माहिती अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर-बादल यांनी दिली. हरयाणामध्ये सोनिपत येथे एनआयएफटीईएम या संस्थेत अन्न प्रक्रिया उद्योगांशी संबंधित प्रयोगशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या आज बोलत होत्या.

संस्थेत उत्पादित झालेल्या उत्पादनांचे विपणन योग्य प्रकारे केले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खाद्य पदार्थाची उत्पादने परवडण्याजोगी, ताजी आणि आरोग्याच्या दृष्टीने हितकर असावी असे सांगत या क्षेत्रात संस्था उत्कृष्टता केंद्र म्हणून नावारुपाला येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेच्या परिसरातील शेतकरी अन्न प्रक्रिया उद्योग शिकून घेण्यासाठी संस्थेकडे वळतील, अशी आशाही व्यक्त केली. यामुळे भारतीय पदार्थांच्या निर्यातीची शक्‍यता खुली होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)